आत्मविश्वासाने शिक्षण सुलभ होते.
वर्ग (Square)
आज शिक्षणात स्वयं अध्ययनाची नितांत गरज निर्माण झालेली आहे. स्व-प्रयत्नाने शिकणे म्हणजे स्वयं अध्ययन होय. विद्यार्थ्याने स्वतःच्या विकसित वाचन, श्रवण व लेखन क्षमतांच्या आधारे एखाद्या नवीन घटकाबद्दल ज्ञानप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न म्हणजे स्व -अध्ययन. स्वअध्ययनामध्ये अध्यापकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या स्व-अध्ययन प्रवृत्तीला क्रियाशील बनविण्यासाठी साधन सुविधा निर्माण करणे.अध्ययन प्रभावी होण्यासाठी पोषक वातावरण, प्रेरणा,जिज्ञासा निर्माण करणे. शिक्षक व विद्याथी यांच्यात भौतिक दृष्टीने अनुकूल संबंध प्रस्थापित करून विद्यार्थ्यांना सुविधा दिल्यास स्व -अध्ययन घडू शकेल. स्व-अध्ययनासाठी विदयार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार करून, विषयानुसार अध्ययन अनुभव द्यावेत. अध्ययन अनुभव सोपे असल्यास अध्ययन आवडीने केले जाते.
वर्ग (square):
कोणत्याही संख्येस त्याच संख्येने गुणले तर येणाऱ्या गुणाकारास त्या संख्येचा वर्ग म्हणतात.
उदाहरणार्थ :
3× 3= 9, 9 ला 3 चा वर्ग म्हणतात.
3 चा वर्ग 9 हे 3² = 9 असे लिहितात.
महत्वाचे नियम :
1) संख्येचा वर्ग दाखविण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात.
2) पूर्णांक संख्येच्या वर्गास पूर्ण वर्ग संख्या म्हणतात.
उदाहरणार्थ : 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64 याप्रमाणे
3) धन संख्येचा वर्ग धन असतो.
उदाहरणार्थ : 9²= 81
4) ऋण संख्येचा वर्ग धन असतो.
उदाहरणार्थ : ( -1)² = 1
5) दशांश अपूर्णांक संख्येत दशांश चिन्हानंतर जर nस्थळे असतील तर वर्ग संख्येत दशांश चिन्हानंतर 2n स्थळे असतात.
उदाहरणार्थ :
(0.5 )² =0.25
(0.03)² = 0.0009
स्वाध्याय : खालील संख्यांचे वर्ग करा.
1) 14 2) 27 3) -8 4)-3/2
5) 1.3 6) 0.06 7) 0.005
उत्तरे :
1) 196 2) 729 3) 64 4) 9/4
5) 1.69 6) 0.0036 7) 0.000025
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


VeryMice
Ajay Patil | September 17, 2020 at 9:33 AM64
Unknown | January 13, 2021 at 7:42 AM